खोतजुवा ग्रामस्थांचा आमदार वैभव नाईक यांना एकमुखी पाठिंबा.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील खोतजुवा येथील ग्रामस्थांनी शिवसेना मविआ उमेदवार आमदार वैभव नाईक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. माजी बांधकाम सभापती यतीन खोत, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी बांधकाम सभापती यतीन खोत म्हणाले की आपत्ती काळामध्ये आमदार वैभव नाईक हे यांनी खोतजुवा गावासाठी सदैव मदत केली आहे. बंदरजेटी, आपात्कालिन बोट, देव श्री देव मसेश्वर देवस्थानाची संरक्षक भिंत अशी कामे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाली आहेत. त्यामुळे अश्या कार्यतत्पर व सुखदुःत सहभागी सहभागी असणार्या आमदारांना आपण व निवडून देणे ही काळाची गरज आहे. खोतजुवा बेटाची एकजूट ही इतर गावांसाठी आदर्श आहे त्याच एकजुटीने आपण आपण वैबव नाईक यांना निवडून देऊया.
यावेळी जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी म्हणाले की प्रतिस्पर्धी उमेदवार हे सामान्य जनतेसमोर येत नाहित असं चित्र आहे कारण त्यांची जीभ घसरुन काही अनुचित वक्तव्य घडण्याची शक्यता आहे. परंतु आमदार वैभव नाईक हे सामान्य कार्यकर्ते व सामान्य यांच्यात मिसळून कार्यरत आहेत.
यावेळी सौ. शिल्पा यतीन खोत म्हणाल्या मी खोतजुवे गावची सुन आहे. शिवछत्रपतींची पुतळा कोसळणे दुर्घटनावेळी त्यांची अस्मिता जपणारे आमदार वैभव नाईक होते व प्रतिस्पर्धी उमेदवाराने वैयक्तिक माझ्याशीही त्यावेळी तिथेही दमदाटी करुन राडा संस्कृतीचे केलेले प्रदर्शन केले. राडा संस्कृती, दहशतवाद हे आपल्या व्यवसायावर व रीजीवनाच्या शांतीवर परीणाम करतात. वाढती महागाई, आरोग्य व अन्य मुद्द्यवरही सरकार अपयशी असल्याचे यावेळी शिल्पा यतीन खोत यांनी सांगितले. त्यामुळे भरपूर विकास कामे केलेल्या व भविष्यात विकासकामे करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांना निवडून आणुया.
यावेळी शंकर खोत, बंड्या खोत, साईप्रसाद खोत, संदीप खोत, जितेंद्र खोत, समीर खोत, राजदीपक खोत, प्रताप खोत, चिंतामणी खोत, मुरलीधर खोत, सुधीर खोत, आकाश खोत, रंजीत खोत, जीतेश खोत, जयेश खोत, जय खोत, महेंद्र खोत, दशरथ खोत, भीवसेन खोत, मयुरेश खोत, आर्यन खोत तसेच आर्या गावकर, स्वाती तांडेल, अश्विनी आचरेकर, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर मानसी घाडीगावकर जान्हवी खोत, भारती खोत, सुवर्णा खोत, पूनम खोत, सानिया खोत, अंकिता खोत, मनिषा खोत, सिद्धि, रिद्धी ,सिद्धी, सोनाली, कार्तिकी, सिया, सायली खोत, समिक्षा खोत उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)