मालोंड श्री देव नारायण यांचा आज वार्षिक जत्रोत्सव.
पोईप |प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मालोंड बेलाचीवाडी येथील साडे सतरा खेड्यांचा अधिपती श्री देव नारायणाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक १८/११/२०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यानिमित्त मंदिरात गाऱ्हाणे घालणे नवस बोलणे फेडणे ओट्या भरणे तसेच रात्रौ श्री देव तरंगासह सवाद्य पालखी मिरवणूक रात्रौ वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)