ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पंतप्रधान मत्स्य संपदा योजना व सिंधुरत्न समृद्ध योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्री दीपक केसरकर, श्री निलेश राणे ,श्री नितेश राणे यांना निवडून द्या.

पंतप्रधान मत्स्य संपदा योजना व सिंधुरत्न समृद्ध योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्री दीपक केसरकर, श्री निलेश राणे ,श्री नितेश राणे यांना निवडून द्या.

प्रकाशन: 18 Nov 2024 01:03 PM
वाचन संख्या 62

रविकिरण तोरसकर यांचे मच्छीमार व मत्स्य व्यावसायिकांना आवाहन.

प्रतिनिधी : भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार व मत्स्य व्यावसायिकांना, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, नितेश राणे व निलेश राणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

रविकिरण तोरसकर यांनी म्हणले आहे की, भारतीय जनता पार्टी सन २०१४ पासून केंद्रात सत्तेत आल्यानंतर मत्स्य व्यवसायाला बळ देण्यासाठी प्रथम नीलक्रांती ,त्यानंतर पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना केंद्र व राज्यस्तरावर राबवत आहे. सदर योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेकडो व्यवसायिकांनी लाभ घेतला आहे. सिंधुदुर्गातील मत्स्य व्यवसायिकांना बळ देण्यासाठी जिल्हा पातळीवर सिंधू रत्न समृद्धी योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये रापन संघांना जाळी खरेदीवर अनुदान, बिगर यांत्रिकी नौकांचे यांत्रिकीकरण, मच्छीमारांना फायबर नौका जाळी व इंजिन खरेदीवर अनुदान, शीत वाहन पुरवठा ,मच्छिमार महिलांना इ स्कूटर शीतपेटीसह पुरविणे, ट्रॉलींग नौकांच्या बळकटी करण करता अनुदान देणे ,बिगर यांत्रिकी नौका यांत्रिकीकरण करणे इत्यादी योजनांचा समावेश आहे. त्यामध्ये सन http://localhost/news/public/uploads/2022-23 मध्ये 270 लाभार्थी यांनी तर http://localhost/news/public/uploads/2023- 24 मध्ये 325 लाभार्थी यांनी लाभ घेतला. यामध्ये जवळजवळ दहा कोटी एवढी रक्कम मत्स्य व्यवसायिकांना वितरित करण्यात आली आहे. अजूनही काही प्रस्ताव प्रलंबित असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेष निधी आणण्याची गरज आहे. तसेच मोठ्या प्रमाणात नव्याने प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासकीय पाठपुराव्याची गरज आहे. केंद्रात खासदार श्री नारायण राणे याचा पाठपुरावा करत आहेत.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यास एकाच विचाराचे सरकार राज्य व केंद्र दोन्ही कडे असल्यामुळे मत्स्यव्यवसायिकांसाठी विविध योजना राबविणे सोपे जाणार आहे. .प्रशासकीय परवानग्या बाबत सुसूत्रता तसेच ,निधीची चणचण पण लाभणार नाही .यामध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांबरोबरच छोट्या मोठ्या बंदरां चा विकास इत्यादी सार्वजनिक उपक्रमांचा पण समावेश आहे. तरी सर्व मत्स्यव्यवसायिकांना आवाहन आहे की त्यांनी महायुतीचे उमेदवार श्री दीपक जी केसरकर, श्री निलेश राणे, श्री नितेश राणे यांना भरघोस मतदान करून विजयी करावे व महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यास मदत करावी असे
रविकिरण चिंतामणी तोरसकर,
( जिल्हा संयोजक ,मच्छीमार सेल, भाजपा, सिंधुदुर्ग) यांनी मच्छिमार व मत्स्य व्यावसायिकांना आवाहन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स