वायंगवडे ग्रा. पं. सदस्य मयुरी परब यांच्या सह अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश.
पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पोईप शहरालगत असलेल्या वायंगवडे मध्ये उबाठाला मोठा धक्का बसला आहे. ग्रा. पंचायत सदस्या मयुरी परब व त्यांचे पती महेंद्र शरद परब व सचिन अनिल घोगळे, राजेंद्र अर्जुन सावंत आणि अनेक ग्रामस्थांनी शिवसेने मध्ये जिल्हा परिषद माजी बाधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
वायंगवडे गावचे माजी उपसरपंच जयवंत परब यांनी हा उबाठाला मोठा धक्का दिला आहे. या प्रवेशाने वायंगवडे ग्रामपंचायत मध्ये शिवसेना गटाची ताकद भक्कम वाढली आहे.
शिवसेना भाजप महायुतीचे कुडाळ मालवण मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांचा झंझावात प्रचार सुरू आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपण उबाठाला वायंगवडे गावच्या ग्रामस्थांनी मोठा धक्का दिला असून ग्रामस्थानचे मी धन्यवाद देतो प्रवेश करत्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
यावेळी पोईप ग्रामपंचायत सरपंच श्रीधर नाईक. पोईप माजी सरपंच शावळाराम नाईक, माजी उपसरपंच विलास माधव,पोईप ग्रा. उपसरपंच विष्णू पालव, पोईप ग्रा.सदस्य संपदा सावंत, पोईप ग्रा. सदस्य दिपाली जाधव, पोईप ग्रा. सदस्य संछीदा पालव,पोईप शिवसेना शाखाप्रमुख नारायण राणे, उपशाखाप्रमुख श्रीधर (पिंटू) पालव. बाबाजी नाईक दादा नाईक, संतोष (बाबू) पालव, स्वप्नील पोईपकर, सुशील जाधव, माजी उपसरपंच संदिप सावंत, राजू देसाई, अशोक पालव, आदि उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)