ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
२३ नोव्हेंबरला विजयाचा जल्लोष महायुतीच करणार.

२३ नोव्हेंबरला विजयाचा जल्लोष महायुतीच करणार.

प्रकाशन: 17 Nov 2024 12:49 PM
वाचन संख्या 117

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला विश्वास.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परीषदेत विधानसभेचे मविआ उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली असून २३ नोव्हेंबर रोजी विजयाचा जल्लोष महायुतीच करणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

भाजपचे नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आमदार वैभव नाईक यांनी म्हणले की, मागील दहा वर्षात वैभव नाईक यांची कारकीर्द पूर्णपणे अपयशी ठरली. शहरात विकास कामांच्या नावांवर फक्त सांगाडे उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे आमदार आता बस्स झालं, असं म्हणायची वेळ आली आहे. विकासाचे कोणतेही व्हिजन नसलेला आमदार म्हणून वैभव नाईकांची ओळख बनली असून शहरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, भाजी मार्केट, रॉक गार्डन, फायर फायटर इमारत अशा अनेक गोष्टी आज अर्धवट स्थितीत असल्याने आमदारांच्या कामाबाबत प्रचंड असंतोष नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शहरात परिवर्तनाचे वारे वाहत असून शहरातून ८०% मतदान महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात सर्व प्रभागात महायुतीच्या वतीने प्रचार फेऱ्या पूर्ण झाल्या असून मतदारांचा प्रतिसाद पाहता २३ नोव्हेंबरला विजयाचा जल्लोष महायुतीच करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तालुका भाजपा कार्यालयात भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, दीपक पाटकर, महेश सारंग, जगदीश गावकर, आबा हडकर, नंदू देसाई, चारुशीला आचरेकर, जॉन नरोन्हा, किशोर खानोलकर, आचरेकर आदी उपस्थित होते. श्री. आचरेकर म्हणाले, मालवण नगरपालिकेला आवश्यक निधी न मिळाल्याने मामा वरेरकर नाट्यगृहाची दुरुस्ती होऊशकली नाही. तसेच अंतर्गत कामासाठी देखील निधी आलेला नाही. त्यामुळे आज रंगमंचाला गळती लागली असून अनेक खुर्चा नादुरुस्त झालेल्या आहेत. नारायण राणे यांनी या नाट्यगृहाला साडेतीन कोटींचा निधी दिला. मात्र त्याच्या दुरुस्ती साठी निधी आमदार वैभव नाईक हे देऊ शकलेले नाहीत. भाजी मंडई, अग्निशमन इमारत, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स याचीही दुरावस्था झाली आहे. नारायण राणे यांनी देशातील पहिले रॉक गार्डन उभारले. पण आमदारांनी आपल्या समर्थक आमदाराच्या हातात याची देखभाल दुरुस्ती दिल्याने रॉक गार्डन बकाल झाले आहे. येथे कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील उबाठाच्या उमेदवाराला आराम देण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असे आचरेकर यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स