ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार नितेश राणे यांच्या विजयाचा शिवसैनिकांचा 'इरादा पक्का' : शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर.

आमदार नितेश राणे यांच्या विजयाचा शिवसैनिकांचा 'इरादा पक्का' : शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर.

प्रकाशन: 08 Nov 2024 11:10 PM
वाचन संख्या 78

आ. नितेश राणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर यांच्या कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यात बैठका.

सिंधुदुर्ग : महायुतीचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष श्री. महेश कांदळगावकर यांच्या संघटन बैठका संपन्न झाल्या. दरम्यान आधी महेश कांदळगांवकर यांनी कणकवली येथे आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन सदिच्छा दिल्या.

कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील शिवसेना शाखंमध्ये महेश कांदळगांवकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महेश कांदळगांवकर यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सूचनांचा व बैठकीचा अहवाल आपण जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना देणार असल्याचे महेश कांदळगांवकर यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर यांच्यासह उप जिल्हाप्रमुख एम एम सावंत महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर व श्रीमती सरिता राऊत, युवासेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, उपतालुकाप्रमुख श्री.दामू सावंत, तालुका अध्यक्ष श्रीमती प्रिया टेमकर, शोभा बागवेआदी उपस्थित होते.

महेश कांदळगावकर यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संघटक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. हा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते कणकवली येथील शिवसेना कार्यालयात भेट देवून, बैठक घेऊन निवडणूक प्रचासंदर्भात आढावा घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी गाठी देऊन सुद्धा त्यांनी प्रचार यंत्रणा सुरू केली. महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यात शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली असून या कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात नितेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा ‘इरादा पक्का’ आहे असा विश्वास कांदळगावकर यांनी व्यक्त केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स