ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळेरे येथील आकाश कंदील स्पर्धेत कैवल्य भोगले, वरुची भोगले प्रथम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तळेरे येथील आकाश कंदील स्पर्धेत कैवल्य भोगले, वरुची भोगले प्रथम.

प्रकाशन: 08 Nov 2024 01:36 AM
वाचन संख्या 106

दिविजा वृध्दाश्रम, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व वाचनालय आणि प्रज्ञागंण यांचे आयोजन.

तळेरे | प्रतिनिधी : दिपावली २०२४ निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथे आयोजित करण्यात आलेल्या आकाश कंदील स्पर्धेत लहान गटात कैवल्य भोगले तर खुल्या गटात रुची भोगले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही स्पर्धा प्रज्ञागंण, तळेरे येथे संपन्न झाली.

असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि वाचनालय तसेच, प्रज्ञागंण दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी अजित कानेटकर यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, उपाध्यक्ष शशांक तळेकर, सचिव मिनेश तळेकर, प्रा. हेमंत महाडिक, दिविजा वृद्धाश्रमाचे सायली तांबे, अश्विनी पटकारे, सतेज रणखांबे, ट्रस्टचे सचिव निकेत पावसकर, सौ. श्रावणी मदभावे, ग्रंथपाल सौ. साक्षी तळेकर, परीक्षक ऋचा तांबे, ऋतू महाडिक आदी उपस्थित होते.

आकाश कंदील स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
मोठा गट : (अनुक्रमे प्रथम तीन) – रुची भोगले, अंकिता बिद्रे, देवेश घुगरे तर लहान गटातून कैवल्य भोगले, धनिष्का तळेकर, मेधांश मदभावे.

विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना मार्गदर्शक निकेत पावसकर म्हणाले की, गेली तीन वर्षे पर्यावरण पूरक, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे आणि सामाजिक जाणीव जागृती निर्माण करणारे आकाश कंदील असा वेगळा विचार घेऊन ही स्पर्धा आयोजित केली जाते. तो विचार समाजात रुजला पाहिजे, त्याची जाणीव जागृती झाली पाहिजे. आणि पुढील वर्षी अजून स्पर्धकांची संख्या वाढली पाहिजे तरच हा सामाजिक विचार पुढे जाईल.

या स्पर्धेला कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण ऋचा तांबे आणि ऋतू महाडिक यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. श्रावणी मदभावे यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रज्ञागणच्या रोशनी बागवे, सोहम सावंत, स्नेहल तळेकर, अंकिता शिंगे, धावडे, विक्रांत सावंत, प्रतिक भालेकर, श्रुती तळेकर, मनीषा परब, जाधव यांनी योगदान दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स