ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
युवा पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान महत्त्वाचा : आमदार प्रवीण दरेकर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

युवा पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान महत्त्वाचा : आमदार प्रवीण दरेकर

प्रकाशन: 08 Nov 2024 01:54 AM
वाचन संख्या 61

सिंधुदुर्ग सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांच्या संकल्पनेचे कौतुक.

तळेरे | प्रतिनिधी : युवा पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आणि गौरव आजच्या काळात कमी झाला आहे. मात्र, ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चैरिटेबल ट्रस्टने अशा घटकांचा सन्मान सोहळा आयोजित केला, यासाठी विशाल कडणे यांचे अभिनंदन, असे गौरवोद्‌गार भाजपचे विधान परिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी काढले. डॉ. विशाल कडणे यांच्या संकल्पनेतून ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय ‘शिक्षक स्नेह मेळावा’ संपन्न झाला, यावेळी आ. दरेकर बोलत होते. यावेळी कणकवली तालुक्यातील तोंडवली येथील सरस्वती समूहाच्या सौ. वर्षा सावंत यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे खजिनदार पवन त्रिपाठी, संपादक किरण शेलार, टिजेसबी बँकेचे डिजीएम राजीव मिश्रा, लेखक व दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन, क्षितीज सातधरे, मुंबई शिक्षक आघाडीचे अध्यक्ष राजू बंडगर, सोमैया विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. गजानन रत्नपारखी, दाण्याचे कमलेश प्रधान, सरस्वती समूहाच्या वर्षा सावंत, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे , २०० शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांसह विविध दिग्गज आणि शिक्षण क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दोन हजारहून अधिक शिक्षक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सिंधुदुर्ग सुपुत्र युवा शिक्षक नेतृत्व डॉ. विशाल कडणे होते. या मेळाव्यामध्ये राज्यस्तरीय निबंधस्पर्धा, टीचर ऑफ द इअर, प्रिन्सिपल ऑफ द इअर आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या शिक्षकांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. वर्ष २०२३ साली उत्कृष्ट कामगिरी केलेल्या १११ शिक्षकांचा सन्मान मेळाव्यात करण्यात आला. जीवन गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मुख्याध्यापक, सर्वोत्कृष्ट विषय शिक्षक आदी विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.

स्मार्टफोन दुरुपयोगापासून तरुणाईला परावृत्त करणे आणि सर्वांना मराठी भाषेचा, अक्षरांचा लळा लावणे, आदी लोकोपयोगी या वृत्तींचा प्रचार करणाऱ्या आजीबाई जोरात नाटकाच्या टीमने शिक्षकांसोबत संवाद साधला. यावेळी या नाटकाचे दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन, अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अभिनेते जयवंत वाडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा परांजपे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स