ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
घडलेला प्रकार अनावधानाने ; सोशल मिडियावर जातीय व धार्मिक पोस्ट टाकून कायदा व सुव्यवस्था भंग केल्यास कारवाई.

घडलेला प्रकार अनावधानाने ; सोशल मिडियावर जातीय व धार्मिक पोस्ट टाकून कायदा व सुव्यवस्था भंग केल्यास कारवाई.

प्रकाशन: 02 Nov 2024 02:26 PM
वाचन संख्या 296

फळविक्रेता प्रकरण ; शांतता कमिटीच्या बैठकीनंतर मालवण पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांची माहिती.

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील फळविक्रेता प्रकरण मध्ये शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली. फळ विक्रेत्याकडून सदरचा प्रकार गुटखा खाऊन बोलताना फवारा उडून फळावर पडल्याने झालेला आहे. सदरचा प्रकार अनावधानाने घडलेला असून त्याने तो हेतूपूर्वक केला नसल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार निष्पन्न झालेले आहे. या करिता सरसकट सर्व फळ विक्रेते यांचे बद्दल गैरसमज पसरवणे चुकीचे आहे अशी भावना व्यक्त झाली अशी माहिती मालवण पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

अनधिकृत फळ विक्री, स्वच्छता, विक्री ठिकाणे निश्चित करणे, फेरीवाले ट्रॅफिक समस्या इत्यादी समस्यांबाबत नगरपालिका व पोलीस प्रशासन यांचे समन्वयाने पुढील उपाययोजना तातडीने करण्याचे ठरवण्यात आले आहे.

१)सर्व फळ विक्रेता,भाजीपाला विक्रेता फेरीवाले यांनी नगरपालिका किंवा ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था कडून विक्री / व्यवसायपरवाना घेणे बंधनकारक आहे

२) सर्व विक्रेता यांचे चरित्र पडताळणी करणे बंधनकारक आहे.

३) विक्री व्यवसाय करताना विक्रीजन्य मालाचे तसेच वैयक्तिक स्वच्छते अनुषंगाने दक्षता घेणे आवश्यक असल्याने औषध व अन्न प्रशासन विभागाकडून तपासणी करून कार्यवाही करण्यात येईल.

४)फळविक्रेता तसेच भाजीपाला विक्रेता यांना नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागी व्यवसाय करणे बाबत बंधनकारक करण्यात येणार आहे येणार आहेत.

५) बाजारपेठेमध्ये ट्राफिकचा प्रश्न सोडवण्या करिता सम विषम तारखेस वेगवेगळ्या बाजूला पार्किंगचे नियोजन नगरपालिका विभागाशी समन्वय साधून करण्यात येणार आहे

मालवण पोलिस निरीक्षक यांनी एकंदरीत प्रकार अनावधानाने घडलेला असून यानंतर नागरीकांना याद्वारे आवाहन करुन काही सूचना जारी केल्या आहेत
१)सोशल मिडीयावरती जातीय किंवा धार्मीक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नये.

२)कोणत्याही धर्मविषयीं जाणीवपूर्वक द्वेष अथवा गैरसमज पसरवू नये.

३) जातीय किंवा धार्मिक सलोखा बिघडेल असे कृत्य करू नये.

४) विधानसभा निवडणूक पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे मनाई आदेशाचा भंग करू नये.

५)व्हाट्सअप ग्रुप ऍडमिन यांनी आक्षेपार्ह मेसेज किंवा पोस्ट तात्काळ डिलीट करून संबंधित व्यक्तींना याबद्दल समज द्यावी.अन्यथा सदर बाबत व्हाट्सअँप ग्रुप ऍडमिन यांना जबाबदार धरण्यात येईल.

६)जो कोणी जातीय धार्मीक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्था भंग करणारी कृती करेल अशा व्यक्ति विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

शांतता व सलोखा राखणे कामी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मालवण पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स