ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात सूर दिवाळी कार्यक्रम.

मालवणात सूर दिवाळी कार्यक्रम.

प्रकाशन: 29 Oct 2024 10:53 PM
वाचन संख्या 306

मालवण | प्रतिनिधी :

मालवण मधील कलासेवक युवकांचा समूह ‘कलांगण मालवण’ यांचा दीपावलीनिमित्त रसिकांसाठी ‘सूर दिवाळी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये
३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता श्री दत्त मंदिर, भरड मालवण येथे अभंग व नाट्य गीतांचा अनोखा नजराणा सादर होणार आहे. यात दिग्गज अनुभवी सोबत नवोदित युवा कलाकारांच्या संचात सदर कार्यक्रम सादर होईल. कार्यक्रमाला महेश तळवडेकर, सुधीर गोसावी, अक्षय सातार्डेकर व वैभव मांजरेकर यांची कार्यक्रमाला संगीत साथ असेल.

या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गायक श्री सुनील परुळेकर व संगीत अलंकार ॲड. दिलीप ठाकूर यांच्या दैवी सुरांची जादू श्रोत्यांना अनुभवता येईल. ध्वनी संयोजन सर्वेश परुळेकर आणि कार्यक्रमाचे निवेदन ॲड. प्रथमेश सामंत करतील. या संगीतमय कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कलांगण मालवणच्या वतीने श्रीरंग करवडकर आणि देवेन कोळंबकर यांनी केले आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स