ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
न्हावेली येथे आकाशकंदिल स्पर्धा.

न्हावेली येथे आकाशकंदिल स्पर्धा.

प्रकाशन: 26 Oct 2024 04:18 PM
वाचन संख्या 89

मळगांव | नितिन गावडे : दिवाळी पाडव्यानिमित्त न्हावेली चौकेकरवाडी ग्रामस्थ आयोजित शनिवार ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता भव्य खुली आकाश कंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या ४० स्पर्धेकांना संधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी रोख पारितोषिके तसेचं स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रुपये १५००/- कै. चंद्रकांत नाईक यांच्या स्मरणार्थ सौ. नितेशा नाईक यांजकडून, द्वितीय पारितोषिक रोख रुपये १०००/- श्री. विठ्ठल परब, कु. तुषार परब यांजकडून तर तृतीय पारितोषिक रोख रुपये ५००/- श्री. गजा दळवी तंटामुक्ती अध्यक्ष न्हावेली यांजकडून ठेवण्यात आले आहे. बुधवार दि. ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत स्पर्धेमध्ये प्रवेश स्वीकारा जाईल, आकाश कंदिल मंध्ये थर्माकोल वापरु नये, आकाश कंदीलला स्पर्धेकांना आपले नाव, गांव, व मोबाईल नंबर लावणे बंधनकारक आहे व परिक्षकांचा निणर्य अंतिम राहील असे नियम स्पर्धेसाठी निश्चित केले आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८९७५१९८६८९, नंबरवर संपर्क करून नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स