मालवणात शिवसेनेच्या वतीने माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवर यांचे जल्लोषात स्वागत.
मालवण | प्रतिनिधी : मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. आज २२ ऑक्टोबरला मालवणातील रामेश्वर हाॅटेल येथे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेना पक्ष निरीक्षक दीपक वेतकर व बाळा चिंदरकर, उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, तालुका प्रमुख राजा गांवकर व तालुकाप्रमुख महेश राणे, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, युवासेना जिल्हा प्रमुख ॠत्विक सामंत, युवतीसेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर, तालुका संघटक उद्योजक प्रीतम गावडे, युवासेना सोशल मिडिया जिल्हा प्रमुख हर्षद पारकर आणि शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)