ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवणात आमदार वैभव नाईक यांनी ग्रामदैवत श्री देव रामेश्वर - नारायण चरणी श्रीफळ अर्पण करुन घेतले आशिर्वाद.

मालवणात आमदार वैभव नाईक यांनी ग्रामदैवत श्री देव रामेश्वर - नारायण चरणी श्रीफळ अर्पण करुन घेतले आशिर्वाद.

प्रकाशन: 23 Oct 2024 03:48 PM
वाचन संख्या 283

२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी भरणार अर्ज.

ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, युवतीसैनिक, महिला आघाडी कार्यकर्त्या व मविआ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण देऊळवाडा येथे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण , श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले आणि श्रीफळ अर्पण करुन आशिर्वाद घेतला. आमदार वैभव नाईक हे २४ ऑक्टोबर रोजी २०२४ च्या विधानसभा निवडणूकीचा फाॅर्म भरत असून त्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मविआ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह देवदर्शन केले. यावेळी आमदार वैभव नाईक यांचा विजय होऊन ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत तसेच महाविकास आघाडीची सत्ता येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे घालण्यात आले. यावेळी श्री देव रामेश्वर मानकरी तसेच गांवकर मंडळींच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या सह दादा गांवकर व मानकरी गांवकर मंडळी, ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर व सन्मेष उर्फ राजू परब, माजी नगरसेवक नितीन वाळके, माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, माजी नगरसेवक महेश जावकर, माजी नगरसेवक किरण आपटे, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, नरेश हुले, उमेश चव्हाण, अक्षय रेवंडकर, सिद्धेश मांजरेकर, गणेश चव्हाण, अक्षय भोसले, आना मोंडकर, यशवंत गांवकर, मोहन मराळ, प्रसाद आडवणकर, नाना गांवकर, गौरव वेर्लेकर, संजय लुडबे, रश्मीन रोगे, बाॅनी फर्नांडिस,विजय कोळगे, दत्तगुरु पोईपकर, बंड्या लुडबे, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, सुहास वालावलकर, चिंट्या डिचवलकर, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुका संघटक पूनम चव्हाण, नीना मुंबरकर, दीपा शिंदे, युवतीसेना जिल्हा प्रमुख निनाक्षी शिंदे मेथर, युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा खोत, सोनाली डिचवलकर, रुपा कुडाळकर, मंदा जोशी, विद्या फर्नांडिस, रश्मी परुळेकर अजना सामंत, माजी नगरसेविका शीला गिरकर, माधवी प्रभू, सुर्वी लोणे, नम्रता जोशी, रिया गोलतकर, काँग्रेस उप जिल्हाध्यक्ष मेघनाद धुरी, जेम्स फर्नांडिस, रवी तळाशीलकर,शशी यादव, अरविंद मराळ, भूषण राऊळ व शिवसेना, युवासेना, युवतीसेना , महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मविआ पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स