ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग संस्थेच्या वतीने कार्यशाळा.

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग संस्थेच्या वतीने कार्यशाळा.

प्रकाशन: 20 Oct 2024 07:18 PM
वाचन संख्या 108

मसुरे | प्रतिनिधी : माणूस आणि माणसाचे मन हा धम्माचा मुख्य विषय आहे. मन घडवते तसा माणूस घडत असतो. त्यामुळे मनाला घडविण्याची प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही प्रक्रिया म्हणजेच धम्मप्रवास होय असे प्रतिपादन दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत पाली भाषा अभ्यासक अमित  मेधावी यांनी व्यक्त केले. यावेळी दर्पण प्रबोधिनी या संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे, सचिव सुभाष कदम, दर्पण महिला फ्रंट अध्यक्षा स्नेहल तांबे, सल्लागार डॉ. अशोक कदम, श्रीधर तांबे, प्रज्ञा कदम, संजना तांबे, महेंद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

अमित मेधावी म्हणाले, मनामध्ये सतत येत असणारे विचार न थांबवता पाहता यायला हवेत. त्यानंतर त्या विचारांची दोन गटात विभागणी करायला हवी ती कुशल आणि अकुशल अशी. कुशल विचारांना सोबत घेऊन कुशल भावनांचा विकास करावा. अकुशल विचार दूर करावेत. ज्यावेळी मनामधील लोभ आणि द्वेष नाहीसा होऊ लागतो, त्यावेळी आपला मनोविकास घडू लागतो. सदाचार, विचारांची स्पष्टता आणि भावनांची शुद्धी या पायरीने पुढे गेल्यानंतर खर्‍या अर्थाने जीवन बदलते. मैत्री करुणा यांसारख्या कुशल भावनांनी सदोदित भरले गेलेले मन मानवाला खर्‍या सुखाचा अनुभव प्रदान करते. हाच मनोविकास होय, जो धम्माने सहजसाध्य होतो. पुढे आपले मूळ अस्तित्व याविषयी बोलताना शरीर, संवेदना , चित्त, धम्म स्वतःला ओळखावे,यावरुन आपले अस्तित्व ओळखावे. मनाच्या मुख्य कार्याविषयी बोलताना सांगितले जाणणे,ओळखणे, संवेदन करणे, प्रतिक्रिया देणे,हे मनाचे समाधान व्यक्त करत असते. यावेळी दर्पणचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सिद्धार्थ तांबे, सुधीर तांबे, सुनिल तांबे, निलेश पवार, पूनम कदम, संतोष तांबे,अनिल तांबे, अनुष्का तांबे, विलास तांबे, निवेदक शैलेश तांबे, बौद्ध चारी सिद्धार्थ जांभवडेकर, प्रमोद कासले, प्राध्यापक हेदुळकर तसेच कार्यकारिणी सदस्य मोठया संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल तांबे, आभार सचिव सुभाष कदम यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स