आमदार नितेश राणे यांना भाजपाच्या पहिल्या यादीत उमेदवारी.
कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद.
कणकवली | ब्यूरो न्यूज : देवगड – वैभववाडी – कणकवली विधानसभा मतदार संघातून आमदार नितेश राणे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत उमेदवारी दिली आहे. ९९ उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने जाहीर केली. यात आमदार नितेश राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. पहिल्याच यादीत ही उमेदवारी जाहीर झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला गेला आहे. ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)