मैदानी क्रिडा स्पर्धेत मळगांव हायस्कूलची कु. समीक्षा वरक जिल्ह्यात प्रथम.
मळगांव | नितिन गावडे : सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा कार्यालय ओरोस येथे झालेल्या १७ वर्षीय वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत मळगांव इंग्लिश स्कूल, मळगांव ची विद्यार्थिनी कु. समीक्षा जानू वरक हिची १५०० मी. रनिंग या मैदानी क्रिडाप्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. या विद्यार्थ्यांनीची पुढे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. रत्नागिरी (डेरवण) येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर त्याची निवड झाल्याबद्दल या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांनीचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री. संदीप कारीवडेकर, सौ. आनंदी मोर्ये यांचे मळगांव ऐक्य वर्धक संघ मुंबई संस्थेचे अध्यक्ष श्री. शि. न्हा. मळगांवकर, सचिव आर. आर. राऊळ, संस्थेचे पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन श्री मनोहर राऊळ, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)