नॅशनल रेल्वे मजदूर युनियनला पाठिंबा देण्याचे वेणू नायर यांचे आवाहन.
मधू दंडवते नसते तर कोकण रेल्वे झालीच नसती :वेणू नायर
कणकवली | उमेश परब : रेल्वे युनियनच्या निवडणूकीवेळी नॕशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर कणकवलीत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी नॕशनल रेल्वे मजदूर युनियनच्या कामावर आणि ध्येयावर प्रकाश टाकला. ‘कोकण रेल्वेचे खाजगीकरण व्हायला द्यायचे नसेल, तर नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. अन्यथा खाजगीकरण झाले तर अदानी – अंबानी यांच्या हातात रेल्वे जाऊन सामान्य माणसाला प्रवास करणे कठीण होऊन बसेल, असे वेणू नायर यांनी सांगितले.कणकवलीत रेल्वे कामगारांच्या हिताचे प्रश्न नेहमीच नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने प्रमुख्याने मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत आपणच बाजी मारणार, असेही नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी बोलताना सांगितले. कोकणात आल्यावर कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण मधु दंडवते नसते, तर कोकण रेल्वे झालीच नसती, असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी सांगितले. यावेळी वेणू नायर यांच्यासोबत कणकवली रेल्वे कामगार संघटनेचे सचिन सरगंले, संजय करिवले, संतोष बापट, प्रशांत सावंत, संदीप संरगले, कांबळे, तांबे, खामकर, वडवळकर, गुरव,सावंत, आदी कर्मचारी उपस्थित होते.
(फोटो : आंतरजालावरून साभार)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)