ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
राणे समर्थक नितीन पवार यांचा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

राणे समर्थक नितीन पवार यांचा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.

प्रकाशन: 10 Oct 2024 03:39 PM
वाचन संख्या 135

कणकवली | ब्युरो न्यूज : मालवण तालुक्यातील श्रावण येथील खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांनी खासदार राणे यांना सोडचिठ्ठी देत कणकवली विजय भवन येथे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्या माध्यमातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. नितीन पवार हे राणे यांचे खंदे समर्थक म्हणून परिचीत आहेत व तसेच त्यांनी उपतालुकाप्रमुख, देवगड निरीक्षक म्हणून काम केलेले आहे. हिवाळे विभागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ.वैभव नाईक यांना मोठ मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार श्री नितीन पवार यांनी केला आहे.

यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी,माजी नगरसेवक यतीन खोत, स्वप्नील पवार आणि शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स