ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'छत्रपती शिवरायांस पत्र' स्पर्धेला भरघोस प्रतिसाद.

'छत्रपती शिवरायांस पत्र' स्पर्धेला भरघोस प्रतिसाद.

प्रकाशन: 09 Oct 2024 10:41 PM
वाचन संख्या 98

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांचे आयोजन ; केंद्रशाळा, कट्टा येथे १९ ऑक्टोबरला बक्षिस वितरण.

मालवण | प्रतिनिधी : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्यावतीने आयोजीत ‘छत्रपती शिवरायांस पत्र’ या लेखन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला आहे. सिंधुदुर्ग सोबतच इतर जिल्ह्यातूनही एकूण ७३ स्पर्धकानी या स्पर्धेत भाग घेतला.या स्पर्धेत खालील २७ स्पर्धकांचे निबंध बक्षीस पात्र ठरले आहेत.

मालिनी पालव – मालवण, रोशनी धनावडे – राजापूर, मनिषा पाटील – कलमठ, सतिश कदम – कांदळगांव, डॉ दर्शना कोलते – कसाल, संजय तांबे – फोंडाघाट, किशोर वालावलकर – सावंतवाडी, रमेश सावंत – मुंबई, गौरी पाटकर – आनंदव्हाळ, नवनाथ तांडेल – पालघर, मनोज सूर्यवंशी – जळगाव, प्रज्ञा पवार – रत्नागिरी, श्रेयस शिंदे – कळसुली, रसिका म्हापसेकर – चौकुळ, युवराज पाटील – पन्हाळा, कोमल तोंडवळकर – कोळंब, डॉ सोमनाथ परब – कट्टा पेंडूर, रजिया सिदलाळे – सावंतवाडी, सिद्धी परब – मुळदे, भावना सिद्धये – सावंतवाडी, गुरुनाथ ताम्हणकर – बागायत, मैत्रेयी बांदेकर – मालवण, सायली म्हाडगुत – मसुरे, विनोद दळवी – आंबडोस व्हाळवाडी, इशा इळकर – कोळोशी, बाळकृष्ण राणे – सावंतवाडी, ओवेश नाडकर – मुळदे.

प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ ५या व्यतिरिक्त आणखी १९ स्पर्धकांना उल्लेखनीय म्हणून प्रशस्तीपत्र व बक्षीस देण्यात येणार आहे. या सर्व २७ गुणवंतांचे क्रमांक बक्षीस वितरणावेळी जाहीर करण्यात येतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

यावेळी कॉम्रेड प्राचार्य आनंद मेणसे, बेळगांव यांचे
विशेष व्याख्यान होईल आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. अजय कांडर(कवी व पत्रकार)कणकवली उपस्थित रहाणार आहेत.

केंद्रशाळा कट्टा नं १, ता मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे शनिवारी १९ ऑक्टोबर २०२४ रोजी, दुपारी ३.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ आयोजित केला आहे. सर्वानी या समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. देवदत्त परुळेकर ( अध्यक्ष , बरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण), श्री. किशोर शिरोडकर (कार्याध्यक्ष), श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर (कार्यवाह) यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स