ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आदर्श शिक्षक किशोर कदम यांचा ओसरगांव मध्ये नागरी सत्कार.

आदर्श शिक्षक किशोर कदम यांचा ओसरगांव मध्ये नागरी सत्कार.

प्रकाशन: 08 Oct 2024 07:42 PM
वाचन संख्या 92

मसुरे | प्रतिनिधी : जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्ताने ओसरगांव प्राथमिक शाळा १. चे मुख्याध्यापक किशोर कदम यांचा ओसरगांव ग्रामस्थांच्या
वतीने शाळेच्या सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना किशोर कदम यानी ग्रामस्थांचे सहकार्य आणि सहशिक्षक यांच्या सोबतीने केलेल्या शैक्षणिक कामामुळे मला प्रशासनातर्फे पुरस्कार जाहीर झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी किशोर कदम यांना जाहीर झाला. यानिमित्ताने त्यांचा माजी विद्यार्थी समिती, शालेय व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षण प्रेमी, ग्रामस्थ यांच्या वतीने हा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ता तथा माजी जेष्ठ शिक्षिका वंदना विजय आपटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अँड.विलास परब, विवेक परब, जगन्नाथ राणे , प्रवीण नाईक, सुदर्शन नाईक, दिपक आंगणे, अध्यक्ष जीवबा अपराज, उपाध्यक्ष जाधव मॅडम राजेश कदम, रसिका तांबे, सुप्रिया अपराध, संदेश नाईक, अपेक्षा चव्हाण, शिक्षिका शितल दळवी, राजश्री तांबे, प्रमिता तांबे मॅडम आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक परब यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स