ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरेच्या औषध निर्माण अधिकारी नयना भोजने कांबळी यांच्या वैद्यकीय सेवाकार्याचा गौरव.

प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरेच्या औषध निर्माण अधिकारी नयना भोजने कांबळी यांच्या वैद्यकीय सेवाकार्याचा गौरव.

प्रकाशन: 02 Oct 2024 10:34 AM
वाचन संख्या 138

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील औषध निर्माण अधिकारी श्रीमती नयना रुपेश भोजने कांबळी यांचा महाराष्ट्र राज्य औषध निर्माण अधिकारी संघटना शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हा परिषद आरोग्य विभागातील उल्लेखनीय कामाबद्दल मान्यवरांच्या हस्ते कुडाळ येथे गौरव करण्यात आला. या प्रसंगी त्यांना शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य औषध निर्माण अधिकारी संघटना शाखा सिंधुदुर्गचे मधुकर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती सई धुरी, आर एस करतसकर, रिजवान पिंपरी, बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नयना भोजने कांबळी यांचा गौरव करण्यात आला.

मसुरे, चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुद्धा त्या रुग्णांना चांगली सेवा देत आहेत.
आरोग्य विभागात विशेष सेवा बजावल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य औषध निर्माण संघटना शाखा सिंधुदुर्ग यांनी घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल मसुरे, चौके गावातून तसेच मसुरे, चौके, प्राथमिक आरोग्य केंद्रचे सर्व कर्मचारी वर्ग तसेच मसुरे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचारी, चौके प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी आणि सर्व कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी मालवण आणि सर्व कर्मचारी,
मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, मसुरेतील आजी माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स