ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मळगांवात मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन.

मळगांवात मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन.

प्रकाशन: 29 Sep 2024 10:57 AM
वाचन संख्या 81

मळगांव | नितिन गावडे : भारतीय जनता पार्टी मळगांव व एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मळगांव येथे १ ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मळगांव ग्रामपंचायतलगत असलेल्या पेडणेकर सभागृहात हे १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे.

या शिबिरात सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून मोफत औषधे देखील उपलब्ध असणार आहेत. या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, कर्करोग तपासणी, नेफ्रोलॉजि तपासणी, दंतरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी तसेच लघवी तपासणी, रक्त तपासणी, थायरॉईड तपासणी, शुगर तपासणी’ इसीजी तसेच कर्करोग चाचणी मोफत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर व माजी सभापती राजू परब यांनी केले आहे..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स