वरवडेतील युवक गौरव घाडीगांवकर यांचे मुंबईत आकस्मित निधन.
कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या वरवडे येथील गौरव घाडीगांवकर यांचे रविवारी मुंबई आकस्मिक निधन झाले. नोकरी निमित्त मुंबईत राहत असलेल्या गौरव यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. दिवंगत गौरव हे कणकवली बाजारपेठेतील सुनिता स्टील सेंटरचे मालक श्री. मिलिंद घाडीगांवकर यांचे ते सुपुत्र तर ज्येष्ठ व्यावसायिक श्री. भास्कर घाडीगांवकर यांचे नातू होत.
अत्यंत मनमिळावू, हसतमुख आणि सौजन्यशील अशी ओळख असलेल्या गौरव यांच्या निधनाने कणकवली व परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)