ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सावंतवाडीत २७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण.

सावंतवाडीत २७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण.

प्रकाशन: 24 Sep 2024 10:06 PM
वाचन संख्या 80

प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर यांच्या उपस्थितीत राजवाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन.

मळगांव | नितीन गावडे : मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी सुरू करण्यात येत असलेल्या ‘ग्रैंड मास्टर चोआ कॉकसुई फिरते वैद्यकीय पथक’ यांचा लोकार्पण सोहळा शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. सावंतवाडीत राजवाडा येथील बँक्वेट सभागृहात होणार आहे. या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर उपस्थित राहणार आहेत.

या फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत दाणोली पंचक्रोशीतील फणसवडे, केसरी, दाणोली गावठण, पारपोली, देवसू, ओवळीये या गावांसह आंबेगाव, कुणकेरी या दुर्गम भागात डॉक्टरांमार्फत रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधे देण्यात येणार आहे. आठवड्यातून दोन दिवस हा फिरता दवाखाना या गांवात जाणार आहे. या फिरत्या वैद्यकीय दवाखान्याच्या गाडीतच रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. या गाडीत हात धुण्यासाठी बेसिन, रुग्ण तपासणी साठी बेड, रुग्ण बसण्यासाठी बेंच, औषध विभाग, डॉक्टर व नर्स यांच्यासाठी आसन अशी व्यवस्था आहे.

या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथचे विश्वस्त सीए विवेक दोषी आणि सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स