ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचा उद्बोधक कृतिसत्र उपक्रम संपन्न.

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचा उद्बोधक कृतिसत्र उपक्रम संपन्न.

प्रकाशन: 22 Sep 2024 08:15 PM
वाचन संख्या 116

मळगांव | नितिन गावडे : वेंगुर्ले येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक यांचे अभ्यास केंद्र बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन कृतिसत्र हा शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता, मुक्त विद्यापीठ आणि मुक्त शिक्षण प्रणाली याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. श्याम महादेव चव्हाण आणि प्रा. धिरज रेवण पाचपिले (राज्यशास्त्र विभाग) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा अभ्यास केंद्राचे प्रमुख डाॅ. एम. बी. चौगले उपस्थित होते.

या उपक्रमाबाबत माहिती देताना प्रा.चव्हाण यांनी मुक्त विद्यापीठाच्या पदवी समकक्षतेबाबत विचार मांडले. प्रा. पाचपिले यांनी दुरस्त शिक्षण विभाग तसेच युपीएससी, एमपीएससी परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले यांनी १९९१ पासून ते २०२४ पर्यंत विद्यापीठातील आधुनिक बदलांचा आढावा घेतला तसेच स्पर्धां परीक्षांमध्ये मुक्त विद्यापीठाची उपयुक्तता, क्रिडामहोत्सव, आविष्कार, महोत्सव याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला अभ्यास केंद्र संमंत्रक तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभ्यास केंद्राचे केंद्रसंयोजक डाॅ. जी. पी धुरी यांनी केले तर आभारप्रदर्शन केंद्र सहायक डाॅ. एस. व्ही.परुळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. सुनिल आळवे आणि श्री. मोहन मोबारकर यांनी सहकार्य केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स