पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस दयासागर छात्रालय येथील अनाथ मुलांसोबत साजरा.
युवा नेते विशाल परब यांच्या मार्फत विविध वस्तूंचे वाटप.
मळगांव | नितीन गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या रोणापाल येथील दयासागर छात्रालय या अनाथ मुलांसाठी असलेल्या शाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री. विशाल परब यांच्यामार्फत विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. शाळेतील अनाथ मुलांसोबत केक कापून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मुलांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप बुथ अध्यक्ष श्री.सागर गोठस्कर , दयासागर छात्रालय शाळेचे व्यवस्थापक जिवबा वीर, समाजसेविका श्रीमती मंगल कामत, श्रीमती रत्नप्रभा केळुसकर, रोणापाल ग्रामस्थ निल गावडे, पारदेश परब यांच्यासह शाळेतील मुले उपस्थित होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)