ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीत ज्येष्ठ रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा.

कणकवलीत ज्येष्ठ रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा.

प्रकाशन: 18 Sep 2024 01:30 PM
वाचन संख्या 197

२० हजार रुपयांनी भरलेले पाकीट केले संबंधिताच्या स्वाधीन.

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कणकवलीतील रिक्षाचालकांच्या मेहनतीची व प्रामाणिकपणाची नेहमीच प्रशंसा होत असते. त्याचा पुन:प्रत्यय येणारी एक घटना कणकवलीत घडली आहे. प्रवीण गावडे या ज्येष्ठ रिक्षा चालकांना, कणकवलीत – नरडवे मार्गावरील एका हॉस्पिटल समोरील गतिरोधकाजवळ पैशाने भरलेले एक पाकीट पडलेले आढळले. हे पाकीट रिक्षाचालक गावडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आतील ओळखपत्र तपासले असता तहसील कार्यालयातील कर्मचारी संभाजी खाडे यांचे ते ओळखपत्र त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी याबाबत कणकवलीतील रहिवासी असलेले व महसूल कर्मचारी अरुण जोगळे यांच्याशी संपर्क साधला व पाकिटात असलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधत पाकिटाचे मूळ मालक संभाजी खाडे यांना हे पाकीट परत केले. रिक्षाचालक गावडे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. श्री प्रवीण गावडे हे कणकवली रेल्वे स्टेशन येथे रिक्षा व्यवसाय करतात.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर यांच्यासह अन्य रिक्षाचालक उपस्थित होते. संभाजी खाडे यांनी देखील या रिक्षा चालकाची प्रशंसा केली व कृतज्ञता व्यक्त केली.

फोटो सौजन्य : कणकवली ब्युरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स