गडनदी पात्रात आढळला पुरुषाचा मृतदेह…!
कणकवली बाजुच्या नदीपात्र हद्दीत तरंगताना आढळला मृतदेह…!
कणकवली | उमेश परब : आज सकाळी हळवल व कणकवलीच्या मध्ये परंतु कणकवली हद्दीत येणार्या गडनदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
हा मृतदेह पुरुष जातीचा असून नेमका कोणाचा याचा तपास सुरू आहे. हळवल गावातील शेतकरी गुरांना पाणी देण्यासाठी नदी पात्रात गेले असता मृतदेह नदी पात्रात तरंगत असल्याचे निदर्शनात आले. त्यांनतर त्यांनी हळवल सरपंच दीपक गुरव यांना कल्पना दिली त्यानंतर तत्काळ हळवल पोलीस पाटील उदय सावंत, माजी पोलिस पाटील प्रकाश गुरव तंटामुक्ती अध्यक्ष उमेश परब व हळवल ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसात खबर दिली. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याबाबत संभ्रम असून ही आत्महत्या ही घातपात याबाबत उलट सुलट चर्चा परिसरात सुरू आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)