ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अन्नभेसळ जागृतीसाठी दोन भागांचे विशेष ऑनलाईन परिसंवाद संपन्न..!

अन्नभेसळ जागृतीसाठी दोन भागांचे विशेष ऑनलाईन परिसंवाद संपन्न..!

प्रकाशन: 21 Oct 2021 08:42 PM
वाचन संख्या 143

अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले जनतेला मार्गदर्शन..!   

कणकवली | उमेश परब : आजच्या युगात अनारोग्य पद्धतीने व वातावरणात अन्नपदार्थ तयार केल्याचे आढळल्यास, भेसळयुक्त पदार्थ सोबत बाळगल्यास, तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थाच्या सेवनाने कोणाचा मृत्यू झाल्यास अथवा व्यक्तीला शारीरिक त्रास, आजार झाल्यास अशा अनेक गुन्ह्यांसाठी अन्न सुरक्षेविषयीच्या विद्यमान कायद्यांनुसार दोषींविरोधात शिक्षेच्या तरतूदी अस्तित्वात आहेत. या संदर्भातील गुन्ह्यांसाठी आर्थिक दंड, कारावास आदी शिक्षा आहेत. अन्नपदार्थांचा दर्जा चांगला असावा, यासाठी प्रशासन लक्ष देत असते; मात्र सण-उत्सवांच्या कालावधीत नागरिकांनीही जागरूक राहून अन्नपदार्थ विकत घ्यावेत, असे आवाहन कोल्हापूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. मोहन केंबळकर यांनी केले. ते ‘आरोग्य साहाय्य समिती’ आणि ‘सुराज्य अभियान’च्या वतीने आयोजित ‘अन्न भेसळ कशी ओळखावी अन् उपाय ?’ या सुराज्य अभियानाच्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.
या कार्यक्रमात सातारा आणि कोल्हापूर येथील जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी श्री. सुनील पाखरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दुधाचा खवा, केशर, डाळी आदी पदार्थांमधील भेसळ कशी ओळखावी, हे प्रात्यक्षिकांसह दाखवले.
हा कार्यक्रम Hindujagruti.org हे संकेतस्थळ, समितीचे ‘HinduJagruti’हे ‘यू-ट्यूब’ चॅनल, हिंदु जनजागृती समिती, तसेच आरोग्य साहाय्य समिती अन् सुराज्य अभियान यांच्या ट्वीटर हॅण्डल यांद्वारे प्रसारित करण्यात आला. हा दुसरा  भाग  तसेच 13 ऑक्टोबर यादिवशी प्रसारित झालेला या कार्यक्रमाचा भाग पहिलासुद्धा नागरिकांनी अवश्य पहावा आणि ‘भेसळ’ या समस्येविषयी लढा देण्यासाठी ‘सुराज्य अभियाना’शी संपर्क साधावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. वैभव आफळे यांनी केले.
श्री. केंबळकर पुढे म्हणाले की दिवाळीसारख्या सणाच्या वेळी मिठाईवर चांदीऐवजी अ‍ॅल्युमिनियमचा वर्ख वापरला जातो. मिठाईमध्ये, तसेच गुळासारख्या पदार्थावर खाण्याच्या रंगांचा अतिवापर केला जातो. बाजारामध्ये तळलेले अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे खाद्यतेल केवळ 3 वेळाच संबंधित व्यवसायिकांनी वापरले पाहिजे, मात्र असे न होता, अनेकदा मिठाई व्यावसायिक आणि रस्त्यावरील खाद्यविक्रेते खाद्यतेल काळपट होईपर्यंत त्याचा वापर करतात, त्यामुळे नागरिकांनी सजग राहून तळलेले अन्नपदार्थ सेवन करावेत. पॅकबंद पदार्थ घेतानाही त्यातील घटक, त्या पदार्थांची ‘एक्स्पायरी डेट’ आदी गोष्टी पाहूनच ते पदार्थ घ्यावेत. हल्ली चायनीज पदार्थांमध्ये, तसेच काही पॅकबंद पदार्थांवर मोठ्या प्रमाणात ‘अजिनोमोटो’चा वापर केला जातो. अजिनोमोटोयुक्त असलेल्या पदार्थांचे सेवन शरीराला हानीकारक असून यामुळे आतड्याचे विकार, अ‍ॅसिडिटी, पचनाचा त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी हे अशा पदार्थांचे सेवन करणे शक्यतो टाळावे. नागरिकांना कुठल्याही प्रकारची भेसळ आढळल्यास ‘FSSAI’च्या केंद्रीय विभागाला 1800112100 आणि महाराष्ट्रात 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. ‘FSSAI’कडे दूरभाषद्वारे, ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष पत्रव्यवहार यांद्वारे तक्रार करता येते. त्यानंतर ‘अन्न सुरक्षा दला’चे अधिकारी तक्रारदाराला कारवाईबाबतची रितसर माहितीही देतात.
सुराज्य अभियानाविषयी इतर माहितीही वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे ती ग्राहकांनी जरुर पहावी असेही शेवटी आवाहन करण्यात आले .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स