ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाची जयदीप आपटेच्या घरी कसून चौकशी आणि त्याच्या शिल्पालयावर धडक…!

सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाची जयदीप आपटेच्या घरी कसून चौकशी आणि त्याच्या शिल्पालयावर धडक…!

प्रकाशन: 07 Sep 2024 11:05 AM
वाचन संख्या 179

कल्याण | ब्युरो न्यूज : सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी अटक करण्यात आलेला शिल्पकार जयदीप आपटे याची १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुरु आहे. याच सोबत सिंधुदुर्ग पोलिस तपास पथक काल कल्याणमधील आपटे याच्या घरी पोहोचले. आपटे याच्या घरात तीन तासाच्या चौकशी नंतर त्याच्या शिल्पालयात दाखल झाले.

पुतळा तयार करण्यासाठी नेमके काेणते साहित्य वापरले, याचा तपास पोलिस करीत आहे. पोलिसांना आपटे याची आई, आणि शेजारी यांनी तपास कामात सहकार्य केले आहे, असे सूत्रांकडून समजते.

सिंधुदुर्ग पोलिसांचे तपास पथक काल आपटेच्या घरी दुपारी साडे तीन वाजता दाखल झाले. या पथकाने साडे तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत त्यांची आई, आणि अन्य सदस्यांची चौकशी केली. या चाैकशी नंतर पोलिस पथकाने आपटे यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेले त्याचे शिल्पालय गाठले. आपटे याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले होते हे तपास पथकाने पाहिले. छत्रपती महाराजांचा पुतळा त्याच्या शिल्पालयात तयार केला असल्याने शिल्पालयालयातून काही काय पुरावे लागल्यास ते पुरावे सिंधुदुर्ग न्यायालयात सादर केले जाऊ शकतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा २६ ऑगस्ट रोजी पडल्याची घटना घडली. या घटनेच्या दिवसापासून या पूतळ्याचा शिल्पकार आपटे हा पसार झाला होता. त्याने त्या दिवशी त्याच्या कुटुंबियांना तो घटनास्थळी जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याच्या कल्याण येथील घराला कुलुप होते. आपटे यांच्या अटकेची मागणी विरोधी पक्षांसह शिवप्रेमीकडून करण्यात होती. दोन दिवसापूर्वी कल्याणच्या पोलिस उपायुक्त कार्यालयाच्या पथकाने आपटे हा कल्याणच्या घरी येत असताना त्याला अटक केली. आपटे याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आल्यावर त्याला त्याठिकाणी न्यायालयात हजर केले गेले. त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स