ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गणेशोत्सवाच्या 'या' दिवशी पासून सिंधुदुर्ग सह काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची हवामान खात्याने व्यक्त केली शक्यता.

गणेशोत्सवाच्या 'या' दिवशी पासून सिंधुदुर्ग सह काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची हवामान खात्याने व्यक्त केली शक्यता.

प्रकाशन: 07 Sep 2024 10:29 AM
वाचन संख्या 135

ब्युरो न्यूज : सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भाला तर पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. त्यानंतर चार – पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली. आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे.

आज म्हणजेच शनिवारी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलाय.

आयएमडीने नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यात दिवसभर पावसाची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

याशिवाय गडचिरोली, वाशिम, यवतमाळ तसेच आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस होणार आहे. दुसरीकडे मुंबईसह पुणे शहराला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने पुणे शहराला आज नारिंगी इशारा दिला आहे. शनिवारी पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच पुणेकरांची तारांबळ उडू शकते.

आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आजपासून पुढील ४ दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. रायगड, सातारा आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, शनिवारी रायगड, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि यावल शहरातही पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुफान पावसाची शक्यता आहे.

रविवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे, हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स