ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा..!

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा..!

प्रकाशन: 05 Sep 2024 04:16 PM
वाचन संख्या 116

१० सप्टेंबरपर्यंत पर्यंत नांव नोंदणीची मुदत.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘मालवण तालुका पत्रकार समिती’ यांच्या वतीने मालवण तालुका पत्रकार समिती सदस्यांसाठी घरगुती गणपती बाप्पा सजावट स्पर्धा गणेशोत्सव कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. पारंपरीक व इकोफ्रेंडली सजावट यांना या स्पर्धेत प्राधान्य राहणार आहे.

सहभागी स्पर्धकांमधून विजेता स्वरूपात तिघांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धा प्रमुख म्हणून अमित खोत, दत्तप्रसाद पेडणेकर यांच्याकडे जबाबदारी असणार आहे, अशी माहिती पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली.

मालवण तालुका पत्रकार समिती कार्यकारणी बैठकित या वर्षीही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत घरगुती गणेश मूर्ती व सजावट स्पर्धा मालवण तालूका पत्रकार समिती सदस्यांसाठी निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पारितोषिके अध्यक्ष संतोष गावडे, अर्जुन बापार्डेकर, अमित खोत यांनी पुरस्कृत केली आहेत.

स्पर्धाकांनी आपली नाव नोंदणी मालवण तालुका पत्रकार समिती ग्रुपवर तसेच खजिनदार सिद्धेश आचरेकर यांच्याकडे १० सप्टेंबर पर्यंत नोंदवावीत.

तसेच गणपती मूर्ती व सजावट फोटो व व्हिडिओ यासह सजावट पारंपरिक पद्धत, इकोफ्रेंडली अश्या कोणत्या स्वरूपात केली त्याबाबत माहिती स्पर्धा प्रमुख अमित खोत, दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या मोबाईल नंबरवर सर्व सहभागी स्पर्धाकांनी पाठवावी.
पत्रकार समिती पदाधिकारी, सदस्य हे स्पर्धकांच्या घरी जाऊनही परीक्षण करणार आहेत. तसेच स्पर्धा प्रमुख यांच्या परीक्षण नंतर सर्वानुमते तीन विजेते निश्चित केले जाणार आहेत. गेल्या वर्षी स्पर्धेस चांगला प्रतिसाद लाभला. या वर्षी जास्तीत जास्त समिती सदस्य यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन अध्यक्ष संतोष गावडे, सौगंध बादेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स