ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज  पुतळा दुर्घटनेतील मुख्य संशयीत जयदीप आपटे व चेतन पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी…!

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील मुख्य संशयीत जयदीप आपटे व चेतन पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी…!

प्रकाशन: 05 Sep 2024 04:45 PM
वाचन संख्या 210

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल असलेले मुख्य संशयित आरोपी शिल्पकार जयदीप आपटे तसेच पोलीस कोठडीत असलेला अन्य संशयित आरोपी सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज गुरुवारी दुपारी मालवण न्यायालयात हजर केले असता १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळा उभारणी ठेकेदार शिल्पकार जयदीप आपटे, सल्लागार डॉ. चेतन पाटील या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सल्लागार डॉ. पाटील यालायापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर जयदीप आपटे याचा शोध सुरु होता. त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आउट नोटीसही जारी केली होती. बुधवारी रात्री मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला कल्याण येथून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्याला मालवण पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. दुपारी या दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. सरकारी पक्ष व संशयित आरोपींच्या वतीने बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी दोन्ही संशयित आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

अत्यंत संवेदनशील असलेल्या या प्रकरणात आता पोलिस व संबंधीत यंत्रणा कठोर व निष्पक्ष कारवाई करत चौकशी करतील अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 294

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स