ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
खासदार संजय राऊत शुक्रवारी मालवणात, कार्यकर्ता मेळाव्यात कुणावर तोफ डागणार ?

खासदार संजय राऊत शुक्रवारी मालवणात, कार्यकर्ता मेळाव्यात कुणावर तोफ डागणार ?

प्रकाशन: 29 Aug 2024 04:23 PM
वाचन संख्या 122

राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात आता राज्यस्तरावरील बड्या नेत्यांचे मालवण दौरे वाढले आहेत. दोन दिवसापुर्वी शिवसेना उबाठा पक्षाचे आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दौऱ्यानंतर आता शिवसेना नेते खासदार श्री.संजय राऊत हे मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणार आहेत. या निमित्ताने संजय राऊत आपल्या पक्षातील शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध ठाकरे वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे.खासदार संजय राऊत यांचे शुक्रवारी ३० ऑगस्टला सकाळी १०.०० वा. चिपी विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी १०.३० वा.मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करतील. सकाळी ११.०० वा. समर्थ मंगल कार्यालय कोळंब मालवण येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करतील. त्यानंतर दुपारी २.०० वा. मालवण शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमी, शिवसेना, युवासेना, महिला, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संदेश पारकर आणि संजय पडते शिवसेना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स