मालवणातील राजकोट राड्याप्रकरणी ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल...
राजकोट किल्ला येथील घटना; पोलिसांकडून तपास सुरू…
मालवण |
राजकोट येथे काल झालेल्या राड्याप्रकरणीमालवण पोलिसांनी राणे समर्थक ठाकरे गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.राजकोट किल्ला येथील कोसळलेल्या पुतळ्याच्या पाहणी दरम्यान काल दुपारी राणे समर्थक व ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यात संभाजी पाटील, मेहेक परब हे पोलीस कर्मचारीही जखमी झाले. त्याचबरोबर अनेक कार्यकर्तेही जखमी झाले. त्यामुळे या राड्याप्रकरणी गर्दी, मारामारी, घोषणाबाजी, शासकीय कामात अडथळा, लोकसेवकांना त्यांच्या कामात धाक दाखवून परावृत्त करणे, दुखापत करणे, जिल्ह्यात सुरू असलेल्या मनाई आदेशाचा भंग करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध कलमानुसार दोन्ही गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे हे अधिक तपास करत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)