ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'लाडका शेतकरी योजना' राबवण्यात येणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा..!

'लाडका शेतकरी योजना' राबवण्यात येणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा..!

प्रकाशन: 22 Aug 2024 08:33 AM
वाचन संख्या 476

ब्यूरो न्यूज : ‘लाडकी बहीण व लाडका भाऊ’ योजनांनंतर आता ‘लाडका शेतकरी योजना’ राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. बीडमधील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करुन देणे हे महायुती सरकारचे काम आहे. आम्ही पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचे काम करीत आहोत. आमच्या सरकारचे धोरण कष्टकरी, वारकरी, शेतकरी सुखी हेच आहे. त्यामुळे आता आम्ही ‘लाडका शेतकरी योजना’ राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. त्यानंतर लाडका भाऊ योजना आणली. आता आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार आहोत. सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहीणी लाडक्या झाल्या, आता शेतकरीही लाडका होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु करण्यात येत आहे. विविध नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरु केलीयं. या योजनेची चर्चा सुरु असतानाच आता लाडकी शेतकरी योजनेची घोषणा करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स