ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांगलादेशमध्ये आंदोलन, महिला वर्ल्ड कपवर संकट; Jay shah म्हणाले, आम्ही पण नाही खेळवणार...

बांगलादेशमध्ये आंदोलन, महिला वर्ल्ड कपवर संकट; Jay shah म्हणाले, आम्ही पण नाही खेळवणार...

प्रकाशन: 15 Aug 2024 02:10 PM
वाचन संख्या 48

Jay Shan on hosting ICC Women’s T20 World Cup http://localhost/news/public/uploads/2024: भारतात खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धांबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी महिलांचा टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा भारतात आयोजित होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिलांच्या टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे आयोजन बांगलादेशकडे आहे. मात्र गेल्या काही दिवसात बांगलादेशमध्ये अस्थिरता दिसून आली आहे. तिथे हिंसाचारही झाला, ज्यामुळे राजकीय अस्थिरताही निर्माण झाली होती.

त्यामुळे हा टी२० वर्ल्ड कप बांगलादेशमध्येच होणार की दुसरीकडे हलवला जाणार, यावर प्रश्नचिन्ह आहे. यादरम्यान भारतात ही स्पर्धा होऊ शकते, अशी चर्चा होती. पण पुढील वर्षी होणारा महिलांचा वनडे वर्ल्ड कपही भारतात होणार असल्याने सलग दोन वर्ल्ड कपचे आयोजन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जय शाह यांनी टाइम्स ग्रुपच्या पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, ‘आयसीसीने आम्ही हा वर्ल्ड कप आयोजित करणार का असं विचारलं होतं, पण मी स्पष्टपणे नाही असं सांगितलंय. आपल्याकडे सध्या मान्सुन आहे आणि आपण पुढच्यावर्षी महिलांचा वनडे वर्ल्ड कप स्पर्धाही आयोजित करणार आहोत. त्यामुळे मला सलग दोन वर्ल्ड आयोजित करण्याचे कोणतेही संकेत द्यायचे नाहीत.’

याशिवाय सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा पुरुष संघ भारत दौऱ्यावर येणार असून दोन कसोटी आणि तीन टी२० सामने खेळणार आहेत.याबाबत जय शाह म्हणाले, ‘आम्ही बांगलादेशच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली नाही. तिथे नवे सरकार स्थापन झाले आहे. कदाचीत ते आमच्यापर्यंत पोहचतील किंवा आम्ही त्यांच्याशी संपर्क करू. आमच्यासाठी बांगलादेश मालिका महत्त्वाची आहे.

‘भारत आणि बांगलादेश संघात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही कसोटी मालिका २७ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. त्यानंतर ६ ऑक्टोबरपासून टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स