इन्फोसिस’ला साताऱ्यात आयटी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव, उदयनराजे भोसलेंची डॉ. सुधा मूर्तींकडे मागणी
इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका राज्यसभेच्या खासदार डॉ. सुधा मूर्ती यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली
सातारा – इन्फोसिसच्या माध्यमातून साताऱ्यात आयटी केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासित करून इन्फोसिसने आयटी क्षेत्राशी संबंधित केंद्र साताऱ्यात उभारण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच साताऱ्याला भेट देण्याचे आमंत्रण उदयनराजे यांनी डॉ. सुधा मूर्ती यांना दिले. प्रकल्प उभारण्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ती मदत करण्याचे आश्वासन डॉ. मूर्ती यांनी दिले.
इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका राज्यसभेच्या खासदार डॉ. सुधा मूर्ती यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देऊन त्यांचे स्वागत केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...