ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
RVNL, IRFC सह रेल्वे कंपन्यांसाठी आनंदाची बातमी, २४ हजार कोटी खर्च करण्याची घोषणा; शेअरला बूस्ट मिळणार?

RVNL, IRFC सह रेल्वे कंपन्यांसाठी आनंदाची बातमी, २४ हजार कोटी खर्च करण्याची घोषणा; शेअरला बूस्ट मिळणार?

प्रकाशन: 11 Aug 2024 12:59 PM
वाचन संख्या 51

Railway News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल, असं सरकारनं म्हटलंय. रेल्वेबाबतच्या या घोषणेचा फायदा आगामी काळात रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांना मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा सोमवारी शेअर्सवर काय परिणाम होईल हे पाहावं लागणार आहे

२०३०-३१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित

या प्रकल्पांची अंदाजित किंमत २४ हजार ६५७ कोटी रुपये आहे. हे प्रकल्प २०३०-२०३१ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. या ८ प्रकल्पांमध्ये ७ राज्यातील १४ जिल्ह्यांचा समावेश असेल. या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या प्रकल्पांमुळे रेल्वेचं जाळं ९०० किमीनं वाढणार आहे.

५१० गावांना जोडण्याची तयारी

या प्रकल्पांच्या माध्यमातून ६४ नवीन स्थानके उभारण्यात येणार असल्याचं सरकारनं म्हटलंय. यामुळे देशातील ५१० गावांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल. तर ४० लाख लोकसंख्येवर थेट परिणाम होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ७६७ कोटी किलो कार्बनची बचत होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता

सरकारच्या या घोषणेचा फायदा रेल्वे विकास निगम (RVNL Share), टिटागड रेल सिस्टीम्स, आयआरएफसी (IRFC Share), ज्युपिटर वॅगन्स, बीईएमएल लिमिटेड या कंपन्यांना येत्या काळात मिळू शकतो. सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानामुळे रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांना अनेक प्रकल्प मिळाले आहेत. ज्यामुळे शेअर बाजारात या कंपन्यांची स्थिती पूर्वीपेक्षा बरीच चांगली झाली आहे. गेल्या वर्षभरात रेल विकास निगमसह रेल्वेच्या अनेक शेअर्सनीही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स