आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली नगरपंचायतला वातानुकूलीत शवपेटी..
नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली होती मागणी..
भाजपा ओबीसी मोर्चा वे नरेंद्र गावकर, विजय घरत यांच्या माध्यमातून उद्या शवपेटी करणार सुपूर्द..
कणकवली | उमेश परब : आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली नगरपंचायत ला वातानुकुलीत अशी शवपेटी उपलब्ध होणार आहे. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी अशा शवपेटीची मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली होती. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात नगराध्यक्ष समीर नलावडे यांना शहरवासीयांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्याचा शब्द दिला होता. त्या नुसार भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने नरेंद्र गांवकर व विजय घरत यांच्या वतीने उद्या गुरुवार 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे ही शवपेटी सुपूर्द करण्यात येणार आहे. शहरातील मृत झालेल्या नागरिकाचे मृतदेह ठेवण्याकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दोनच शवपेटी असल्याने अनेकदा ताटकळत राहावे लागते. यामुळे नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कणकवली शहराचे वाढते विस्तारीकरण व शहराची असलेती गरज या दृष्टीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ही मागणी केली होती. त्यानुसार आमदार नितेश राणे यांनी याबाबत शहरवासीयांच्या सुविधे करिता ही मागणी पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. त्याची पूर्तता अखेर उद्या होणर आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)