ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तुमचा नसेल टाॅवर तर आमची संपणार पाॅवर ; साळशी ग्रामस्थांनी दिला इशारा..!

तुमचा नसेल टाॅवर तर आमची संपणार पाॅवर ; साळशी ग्रामस्थांनी दिला इशारा..!

प्रकाशन: 06 Aug 2024 06:11 PM
वाचन संख्या 55

शिरगांव | संतोष साळसकर ( उप संपादक) :
देवगड तालुक्यातील साळशी येथील मोबाईल सेवा वारंवार बिघाड होऊन खंडीत होत आहे. ०२ ऑगस्ट पासून या सेवेत व्यत्यय येत असून सध्या ती पूर्णपणे बंद पड़‌ली आहे.


याठीकाणी संपर्कासाठी दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थीतीत रात्री-अपरात्री गावापासून नजिकच्या सहा किमी अंतरावर जाऊन शहराकडे संपर्क करून मदत घ्यावी लागते. अशा प्रकारच्या बेभरवशी सेवेमुळे ग्राहकांची फारच मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. शासकीय, कामे यासाठी इंटरनेट सेवा आवश्यक असते. या सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. याचबरोबर आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत असून या सर्व प्रतिकुल परिस्थीतीचा ग्राहकांना सामना करावा लागत आहे . याबाबत योग्य ती कार्यवाही करून सेवा सुरळीत करण्यात यावी अन्यथा नाईलाजास्तव जनआंदोलन वेगवे लागेल असा इशारा मोबाईल ग्राहकांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स