ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पठ्ठे चमकले…!

पठ्ठे चमकले…!

प्रकाशन: 27 Jul 2024 03:31 PM
वाचन संख्या 187

स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय तालुका स्तरावर फ्री स्टाईल कुस्तीत भरीव यश.

मालवण | प्रतिनिधी : क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित दिनांक २७ जुलै २०२४ रोजी रेकोबा हायस्कूल,वायरी याठिकाणी संपन्न झालेल्या १९ वर्षाखालील मुले फ्री स्टाईल कुस्ती या क्रीडा प्रकारात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न  रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा कु. मिथिलेश रविंद्र खराडे याने ६५ किलो वजनी गटात तर कु. निशान नितीन शिरोडकर याने ७० किलो वजनी गटात तालुका स्तरावर प्रथम स्थान पटकावले असून जिल्हा स्तरासाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पंतवालावलकर, चंद्रशेखर कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी  विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक प्रा. हसन खान यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स