मालवणमधील लोकअदालतीत 62 प्रकरणांचा तडजोडीने निकाल !
दिवाणी न्यायालय,मालवण येथे दि.27 जुलै रोजी झालेल्या लोकअदालतीचे लक्षवेधी यश!
मालवण प्रतिनिधी : दिवाणी न्यायालय मालवण तालुका विधी सेवा समिती व वकिल संघटना यांच्यासंयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वादपूर्व प्रकरणे, ई-ट्रॅफिकचलन वादपूर्व प्रकरणे व न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांपैकी ६२ प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढणेत आली.
त्यामधून रक्कम रुपये सहा लाख अठरा हजार पाचशे एकेचाळीस मात्र वसुली करणेत आली. मालवण येथील दिवाणी न्यायाधीश श्री.एम.आर. देवकते यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोकअदालतीचे दीपप्रज्वलन करुनउद्घाटन करण्यात आले. यावेळी पॅनेल समिती सदस्य म्हणून ॲड. श्री. अक्षय सामंतउपस्थित होते.
या लोकन्यायालयामध्ये मालवण तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका,पतसंस्था, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, भारतीय दूरध्वनी संचार निगम मालवणतसेच वाहतुक पोलीसांमार्फत ई-चलन प्रकरणे अशा प्रकारची वादपूर्व प्रकरणे ठेवणेतआलेली होती. सदरहू लोकन्यायालयामध्ये वादपूर्व प्रकरणे १०४४ ठेवणेत आली होती.त्यापैकी ४४ प्रकरणे निकाली होवून १लाख १४ हजार ५४१ रुपये रक्कम वसूलीकरणेत आली. न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे २२१ ठेवणेत आली. त्यापैकी १३ प्रकरणेनिकाली होवून ५लाख ४ हजार रुपये रक्कम वसूली करणेत आली. तसेच वादपुर्व ई-ट्रॅफिक चलन ५ प्रकरणांपैकी ५ प्रकरणे निकाली होवून ४ हजार ५०० रुपये रक्कमवसूल करणेत आली. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी या न्यायलयातीलश्रीमती एम.एम. मोर्ये सहाय्यक अधिक्षक, श्री.डी.डी. तिबिले लघुलेखक, श्रीमतीडी.डी.तवटे वरिष्ठ लिपिक, श्रीमती यु.एन. मालणकर वरिष्ठ लिपिक, श्रीम.ओ.ओ. चव्हाणवरिष्ठ लिपिक, श्री.जे.ओस. हळदणकर कनिष्ठ लिपिक, श्री.एल.आर. कांबळी कनिष्ठलिपिक, श्री.सी.एम. गोसावी कनिष्ठ लिपिक, श्री.एस.बी. चिंदरकर चपराशी, श्री.एच.व्ही.कामतेकर कनिष्ठ लिपिक तसेच पोलिस व ट्रॅफीक पोलिस यांचे सहकार्य लाभले
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)