सौ. आनंदी सरकारे यांचे निधन.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मेढा सौ आनंदी आनंद सरकारे ( वय ७४ वर्षे ) यांचे १६ जुलै २०२४ रोजी रहात्या घरी निधन झाले. त्यांच्यावर मालवण स्मशान भूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात त्यांचे पती आनंद उर्फ बाबा सरकारे , एक मुलगा, सुन, मुलगी,जावई, नातवंडं, पुतणा, बहिण, भाचा, भाच्या असा परिवार आहे. सौ. आनंदी सरकारे यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
तारकर्ली येथील समाजसेवक श्री सुरेश बापर्डेकर व प्रकाश बापार्डेकर यांच्या त्या बहीण होत,
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)