तांदळाच्या दाण्यावर साकारले श्री. देव विठ्ठल…!
आषाढी एकादशीच्या निमित्ताने देवगड गवाणे येथील युवा चित्रकाराची कलाकृती..!
देवगड | ब्युरो न्यूज : देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने आषाढी एकादशीचे औचित्य साधून तांदळाच्या दाण्यावरती विठूरायाचे सावळे रूप साकारले आहे. या कलाकृतीची उंची ३ मि. मि. आणि लांबी १ मि. मि. आहे. हे चित्र साकारायला त्याला दहा मिनिटांचा कालावधी लागला. एक्रलिक कलरचा वापर करुन ही कलाकृती साकारली आहे. तांदळाच्या दाण्यावरती हे सूक्ष्म विठ्ठलाचे रूप साकारले आहे.
अक्षय यांच्या कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)