मसुरेत मोहरम निमित्त ताबूत मिरवणूक.
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे येथे मुस्लिम धर्मियांच्या मोहरमची बुधवारी सायंकाळी सांगता झाली. हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात.
मोहरम निमित्त मसुरे बाजारपेठ येथील रफिक शाह वल्ली मोहल्ला आणि मसुरे भरतगड पायथ्या खालील चिस्ती मोहल्ला, व मसुरे पेमवडे येथील अशा एकूण तीन ताबूतांची भर पावसात सुद्धा मिरवणुक काढण्यात आली. मसुरे येथील मुख्य बाजारपेठ व मर्डे विठ्ठल मंदिर येथे मुस्लिम धर्मीय बांधवांनी फेर धरत प्रार्थना केली. यावेळी मसुरे, पेमवडे येथील मुस्लिम बांधव, महिला, बांधव उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)