ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शिवसेना काढणार निष्ठा यात्रा.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शिवसेना काढणार निष्ठा यात्रा.

प्रकाशन: 16 Jul 2024 05:19 PM
वाचन संख्या 93

पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा निष्ठावंत  शिवसैनिकांचा संकल्प.

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील निष्ठा यात्रेचा १८ जुलै रोजी माणगांव येथे होणार शुभारंभ.

ब्यूरो न्यूज : श्री. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र राज्यात चांगला कारभार केला. कोरोना महामारी, पूरस्थिती, चक्रीवादळ अशा अनेक संकाटातुन महाराष्ट्राला वाचविण्याचे काम त्यांनी केले. मात्र शिवसेना पक्षातील काही आमदारांनी गद्दारी करून विश्वासघात केल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र आता पुन्हा एकदा सन्मानाने श्री. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा संकल्प निष्ठावंत शिवसैनिकांनी केला आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे.आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील या निष्ठा यात्रेचा शुभारंभ गुरुवार दि. १८ जुलै २०२४  रोजी सकाळी १० वाजता माणगांव येथे  होणार आहे. सलग ४५ दिवस ही निष्ठा यात्रा सुरू राहणार आहे. यादरम्यान शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांसह जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी यांची निष्ठा यात्रेला उपस्थिती असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यातील  प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढून जनतेशी आणि निष्ठावंत शिवसैनिकांशी  संवाद साधला जाणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिली.

‘श्री. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठा विश्वासघात झाला, उद्धव ठाकरे यांना दगा देणारे हिंदू असू शकत नाहीत, उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होवोत’ , अशा भावना ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी कालच व्यक्त केल्या आहेत.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असण्याचे महत्व या निष्ठा यात्रे दरम्यान जनतेला समजावून सांगितले जाणार आहे. शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदारांनी पक्षाशी गद्दारी केली. मात्र जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे उद्धवजींसोबत, पक्षासोबत आणि जनतेसोबत निष्ठावंत राहिले. त्यांच्याबरोबर पदाधिकारी शिवसैनिकांनीही पक्षाशी निष्ठा दाखवली. या सर्वांचा सन्मान  निष्ठा यात्रा करणार आहे. तरी माणगाव येथून सुरु होणाऱ्या या निष्ठा यात्रेला कुडाळ तालुक्यातील सर्व शिवसैनिक व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स