पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले कै. संजय नाईक कुटुंबीयांचे सांत्वन.
कट्टा | ब्युरो न्यूज : मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे माजी सरपंच, वराडकर हायस्कूल कट्टा प्रशालेचे मुख्याध्यापक कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टाचे संचालक संजय नाईक सर यांचे नुकतेच अकाली निधन झाले. कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मालवण तालुक्यातील पेंडूर येथे नाईक सर यांच्या निवासस्थानी जाऊन नाईक कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शैक्षणिक, राजकिय व सामाजिक कार्याला उजाळा दिला व पेंडूर गांवचा एक कार्यकर्ता व नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली. कै. नाईक सरांना अपेक्षित विकास कार्य करायचाही प्रयत्न राहील असे ते म्हणाले.
यावेळी आनंद उर्फ भाई सावंत, राजन वराडकर, सचिन आंबेडकर, सरपंच स्नेहा परब ,उपसरपंच सुमित सावंत, शेखर फोंडेकर, माजी सरपंच साबाजी सावंत, सत्यवान पाटील, रविंद्र गावडे, गजानन सावंत, अजित सावंत व अन्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)