ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर, या क्रमांकाला मिळाले ११ लाखाचे पहिले बक्षीस !

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर, या क्रमांकाला मिळाले ११ लाखाचे पहिले बक्षीस !

प्रकाशन: 16 Jul 2024 05:44 PM
वाचन संख्या 214

मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक सोडती काढल्या जातात. माहे जून-२०२४ मध्ये दि. ०८/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र सहयाद्री, दि. १४/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी मान्सून विशेष, दि. १९/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव, दि. २१/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, व दि. २६/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेत, असे उपसंचालक (वित्त व लेखा),महाराष्ट्र राज्य लॉटरी,वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2406-A/15221 या श्री.महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाली आहेत. या सोडतीच्या एकूण २६९७ तिकिटांना एकूण रु.१७,७६,७५०/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी मान्सून विशेष तिकीट क्रमांक GS-04/6625 या जलाराम लॉटरी, अकोला यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. २२ लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण १४०५ तिकिटांना एकूण रू.२९,०३,०००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्र गौरव या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण ६१८५ तिकिटांना एकूण रु.८,०८,५००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र तेजस्विनी या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण ८६८ तिकिटांना एकूण रु.५,६३,२००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गजराज मालिका तिकीट क्रमांक GJ-01/0959 या श्री. गणेश एंटरप्रायजेस, दादर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. १४ लाखांचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहेत. या सोडतीच्या एकूण २००५ तिकिटांना एकूण रू.१६,३०,०००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. याशिवाय जून- २०२४ मध्ये साप्ताहिक सोडतीतून ३६७१८ जणांना रू. १,३२,८८,८००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत. सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स