ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चाफेड येथील लीलावती घाडीगांवकर यांचे निधन.

चाफेड येथील लीलावती घाडीगांवकर यांचे निधन.

प्रकाशन: 15 Jul 2024 04:46 PM
वाचन संख्या 209

महिला सक्षमीकरणासाठी झटलेले नेतृत्व हरपल्याची सर्व स्तरातून प्रतिक्रिया.

शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक तथा माजी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती लीलावती धाकू घाडिगांवकर ( ७५ वर्षे ) यांचे शुक्रवार दि. १२ जुलै रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात २ विवाहित मुलगे, ६ विवाहित मुली, सूना, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या येथील श्री रासाई महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष होत्या. त्यांनी गावातील महिला बचत गटामार्फत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी फार मोलाचे काम केले होते. येथील माजी सैनिक तथा माजी सरपंच कै. धाकू घाडीगांवकर यांच्या पत्नी, सैनिक नागरीक पतसंस्था – शिरगांव शाखेतील कर्मचारी कुलदीपक घाडीगांवकर यांच्या मातोश्री तर चाफेड गावठण अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस सौ. दिक्षीता घाडीगावकर यांच्या त्या सासू होत.

त्यांच्या निधनानंतर, महिला सक्षमीकरणासाठी झटलेले नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स